Gas Cylinder Price Reduce : सरकारचा निर्णय गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, तर पहा 400 रुपये सूट कोणाला

Gas Cylinder Price Reduce : केंद्र सरकारने मंगळवारी सर्व गृहिणींना रक्षाबंधनाची भेट दिली आहे त्यामध्ये घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG) सिलेंडरचा किमतीत 200/- रुपयांनी कमी करून सर्व नागरिकांना दिलासा दिला आहे. सिलेंडरच्या किमती दिनांक 30 ऑगस्ट पासून म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी लागू होणार.

याशिवाय केंद्र सरकारने उज्वला योजनेअंतर्गत 75 लाख नवीन सिलेंडर मोफत जोडले जातील असे निर्णय घेतलेले आहेत मंगळवारी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आलेला आहे यादरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे.

उज्वला योजनेत किती मिळणार लाभ :

उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 400/- रुपये गॅस सबसिडी मिळणार आहे कारण उज्वला योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी दोनशे रुपयांच्या सबसिडीचा लाभ घेत आहे या निर्णयानंतर उज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थी आता 703 रुपये प्रति सिलेंडर विकत घेऊ शकणार.

अंमलबजावणी कधीपासून होणार : 

2020 कोरोना च्या महामारी दरम्यान गॅस वरील सबसिडी बंद करण्यात आली होती त्यानंतर आता केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्यांना सबसिडीचा लाभ मिळेल.

उज्वला योजने संदर्भात : 

माहिती व प्रसारण मंत्री यांनी पत्रकारांना सांगताना उज्वला योजने संदर्भातील सर्व ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सबसिडी मुळे एलपीजी साठी प्रति सिलेंडर दोनशे रुपये सबसिडी देते. 2023-2024 या आर्थिक वर्षातील रक्कम सात हजार सहाशे कोटी रुपये असेल उज्वला योजनेत 9.6 कोटी लाभार्थी आहे उर्वरित 31 कोटी ग्राहक स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर करतात. या निर्णयानंतर सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम होईल अशी सुद्धा त्यांनी नमूद केले आहे.

 

जर आपल्याला आमच्या ग्रुपची माहिती आवडली असेल तर कृपया आपल्या मित्रांना शेअर करा आहे आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

 

Leave a Comment