केंद्र सरकार कडून 50 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज, इथे करा ऑनलाईन अर्ज | PMEGP Yojana 2023

Prime Minister’s Employment Generation Programme (PMEGP) :-

केंद्र सरकारच्या मार्फत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP सुरू करण्यात आलेला आहे या अंतर्गत शुष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय MSME द्वारा ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगार तरुणांना मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

बेरोजगार तरुण तरुणी गावातील रोजगार सोडून शहराकडे न येता त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी रोजगार मिळावा या संकल्पनेतून ही योजना राबविली जाते याअंतर्गत बेरोजगार तरुणांना त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 20 लाख ते 50 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

तुम्ही जो व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असेल त्यामध्ये तुम्हाला स्वतःचे 5 ते 10 टक्के रक्कम द्यावे लागेल आणि 15 ते 35 टक्के सरकार मार्फत सबसिडीच्या स्वरूपात दिली जाते आणि बाकी रक्कम टर्म लोन Term loan च्या स्वरूपात बँके मार्फत मिळते.

PMEGP या योजनेअंतर्गत सर्विस युनिट साठी प्रोजेक्ट कॉस्ट वीस लाख रुपये आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट साठी 50 लाख रुपयांपर्यंत दिले जाते संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

PMEGP लोन साठी लागणारी वयोमर्यादा आणि कागदपत्रे खालील प्रमाणे

पीएमईजीपी लोन हा सर्व नियम आणि अटींची योग्य पूर्तता करणाऱ्या लोकांना दिला जातो जर अर्जदार दहा लाख रुपये पर्यंत सर्विस युनिट आणि 25 लाख रुपये मॅन्युफॅक्चर युनिट साठी लोन घेणार असेल तर अर्जदाराचे वय हे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे लागते तसेच अर्जदार हा कमीत कमी  इयत्ता आठवी उत्तीर्ण असावा.

कागदपत्रे

  • पासपोर्ट सोबत भरलेला ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म ची
  • प्रोजेक्ट रिपोर्ट
  • अर्जदाराचा पत्ता आणि रहिवाशी प्रमाणपत्र
  • अर्जदाराची आधार कार्ड पॅन कार्ड आणि आठवी उत्तीर्ण असलेली मार्कशीट
  • जातीचे प्रमाणपत्र
  • ज्या बँकेतून लोन करायचे आहे तेथून आवश्यक  सर्व कागदपत्रे.

 

PMEGP (MSME) ऑनलाईन अर्जाबाबत

लोन मिळवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक्य आहे त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपण अर्ज करण्याआधी एकत्रित करावी जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही अडचण किंवा त्रुटी आढळणार नाही याची दक्षता घ्यावी.

Prime Minister's Employment Generation Programme (PMEGP), Loan for business up to 50 lakhs from central government, apply online here
Prime Minister’s Employment Generation Programme (PMEGP), Loan for business up to 50 lakhs from central government, apply online here

 

सर्वप्रथम आपण खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा. अर्ज भरताना सर्व नियमांचे पालन करा आणि सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर माहिती सेव करा ‘Save Application Data‘ या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट करण्यापूर्वी सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड करावे लागतील आणि सबमिट झाल्यानंतर अर्जदाराचा आयडी आणि पासवर्ड तुम्ही जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येईल.

यानंतर PMEGP म्हणजेच MSME यांच्याद्वारे अर्जदार यांची सर्व कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर तुम्ही म्हणजेच अर्जदाराच्या मोबाईल नंबर वर किंवा ईमेल द्वारे पुढील माहिती ही दिली जाईल यामध्ये अर्जदार पात्र किंवा अपात्र याबाबत सांगण्यात येईल.

जर आपल्याला आम्ही दिलेल्या माहितीचा लाभ मिळाला तर नक्कीच आम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून कळवा साइडवर व्हाट्सअप आयकॉन वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा त्याचबरोबर ही माहिती आपण आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.

1 thought on “केंद्र सरकार कडून 50 लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज, इथे करा ऑनलाईन अर्ज | PMEGP Yojana 2023”

Leave a Comment