महाराष्ट्र शासनातर्फे सर्वांना रु.5 लाख पर्यंत शस्त्रक्रियांसह मोफत उपचार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत(MJPJAY)

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत(MJPJAY) – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबत.

प्रस्तावना :-

राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दि. 2 जुलै 2012 पासून राज्य राबविण्यात येत आहे, तर आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची आरोग्य विमा योजना असून दि. 23 सप्टेंबर, 2018 पासून राज्यात लागू करण्यात आली. दि. 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजना राज्य एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सुधारित योजनेची दि.01 एप्रिल 2020 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. विद्यमान महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेत काही बदल व योजनेची विस्तारीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधी होती.

शासन निर्णय

  1. सध्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने (PMJAY) आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब वर्ष रु.5 लक्ष एवढे आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत(MJPJAY) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब व प्रति वर्ष रु.1.5 लक्ष एवढे आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.5 लक्ष एवढे करण्यात येत आहे
  2. सध्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण रु.2.5 लक्ष एवढी आहे ती आता रु.4.50 लक्ष एवढी करण्यात येत आहे.
  3. सध्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत 1209 उपचार आहेत यापैकी मागणीय नसलेले 181 उपचार वगळण्यात येत आहेत तर 328 मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण उपचार संकेत 147 ने वाढ होऊन उपचार संख्या 1356 एवढी करण्यात येत आहे व 1356 एवढेच उपचार  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचार संख्या 360 ने वाढवण्यात येत आहे. सदर 1356 उपचारांपैकी 119 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील.
  4. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांचे संख्या 1000 एवढी आहे सदर योजना महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमालगच्या महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात 140 व सीमेलवेच्या कर्नाटक राज्यातील 4 जिल्ह्यात 10 अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे त्या व्यतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता अंगी गुण रुग्णालयांची संख्या 1350 होईल. याशिवाय सर्व शासकीय रुग्णालय या योजने या योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येते.
  5. वरील (4) मध्ये नमूद रुग्णालयात व्यतिरिक्त यापुढे मागास भागात नव्याने सुरू होणारी सर्व रुग्णालय अशा रुग्णालयांची इच्छा असल्यास या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत करण्यात येतील.
  6. आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिका तारक कुटुंबे व अतिवास प्रमाणपत्र धार कुटुंबांना लागू करण्यात येत आहे.
  7. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत दि. 14/10/2020 च्या  शासन निर्णयाला या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठी उपचाराची संख्या 74 वरून 184 अशी वाढविण्यात येत आहे तसेच उपचारांची खर्च मर्यादा रु. 30,000/-ऐवजी  प्रति रुग्ण प्रति अपघात रु. 1 लक्ष एवढी करण्यात येत आहे आणि या योजनेचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने करण्यात येत आहे सदर लाभार्थ्याचा समावेश गट मध्ये करण्यात येत आहे यामध्ये लाभार्थ्याच्या अ ब व या गटांमध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्र बाहेरील देशाबाहेरी ल रुग्ण यांचा समावेश करण्यात येत आहे.
  8. सदर योजना संपूर्णपणे हमी तत्त्वावर राबविण्यात येईल म्हणजे उपचाराचा चूक खर्च होईल तो राज्य आरोग्य हमी सोसायटी थेट अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करेल संपूर्णपणे हमी तत्त्वावर राबवण्याची यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत सध्याच्या पद्धतीनुसार विमा आणि हमी तत्त्वावर मात्र वरील 1 ते 7 येथील सुधारित तरतुदीनुसार योजना राबविण्यात येईल.
  9. शासकीय रुग्णालयांना या योजनेतून मिळणारा पैसा संबंध ित संबंधित रुग्णालयांकडे ठेवण्यास परवानगी देण्यात येईल यासंबंधीतील सविस्तर आदेश नंतर निर्गमित करण्यात येतील.

लाभार्थी घटक:- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी घटक पुढीलप्रमाणे असतील

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 

शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे शासकीय निमशासकीय कर्मचारी यासह व कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका धारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होईल, त्याचबरोबर अन्य घटकांचा सुद्धा समावेश करण्यात येत आहे. अन्य घटका ची माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या शासन निर्णय सविस्तर वाचावे.

डाउनलोड शासन निर्णय

   अधिक अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.

1 thought on “महाराष्ट्र शासनातर्फे सर्वांना रु.5 लाख पर्यंत शस्त्रक्रियांसह मोफत उपचार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत(MJPJAY)”

Leave a Comment