Maratha Reservation : श्री मनोज जरांगे पाटील, सरकारने काढला नवीन अध्यादेश, मिळणार कुणबी प्रमाणपत्र

Maratha Reservation (kumbi) :-

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांनी महाराष्ट्र मध्ये होत असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे असे आदेश दिले आहेत.

Maratha Aandolan (जळगाव) :-

त्याचबरोबर आजच्या कॅबिनेट मध्ये मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी नवीन (GR) जीआर काढण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये समिती गठीत करण्यात आलेली आहे ही समिती एक महिन्याच्या आत अहवाल सादर करणार आहे. त्याचबरोबर निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदेंच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य समिती गठीत करण्यात आलेली आहे, ही समिती सर्व कागद पत्र यांचा अभ्यास करणार असल्याचे मुखयमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (New GR) :-

 • निजाम कालीन महसुली नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार.
 • ज्यांच्याकडे निजाम कालीन महसूल नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देण्यात येणार आहेत.
 •  शैक्षणिक, इतर कोणत्याही नोंदी असतील अशा सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील.
 • सर्व नोंदी तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही त्रुटी आढळल्यास ही समिती ती त्रुटी दूर करणार आहे.
 • जरांगे पाटील यांनी समितीला सर्व कागदपत्रे द्यावीत अशी विनंती सुद्धा सरकार द्वारे करण्यात आलेली आहे.
 • रद्द झालेला सुप्रीम कोर्टातील आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध मुख्यमंत्री.

मुख्यमंत्री यांनी सांगितले गरज पडल्यास तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री यांची चर्चा करण्याचे आश्वासन सुद्धा दिलेले आहेत.

श्री मनोज जारांगे पाटील यांची आमदार अर्जुन खोतेकर आणि राजेश टोपे यांच्या कडून त्यांची मनधरणी करून मंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या सर्व निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटील :-

 • श्री. मनोज जरांगे पाटील अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उद्या सकाळी 11 वाजे वाजता निर्णय घ्यावा अशी विनंती अर्जुन खोतेकर यांनी केलेली आहे.
 • जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र आज पासून देण्यात यावे अशी विनंती केली होती.
 • त्यावर राजेश टोपे यांनी सांगितले की वंशावळीमध्ये कुणबी लिहिलं असल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील. या साठीच नवीन अध्यादेश काढला आहे.
 • श्री. मनोज जरांगे पाटील यांनी विनंती केलेली आहे की आंदोलनादरम्यान झालेल्या सर्व केसेस (गुन्हे) मागे घेण्यात यावी.
 • त्यावरही सरकार द्वारे सर्व केसेस (गुन्हे) परत घेतल्या जातील अशे आश्वासन जरांगे पाटील यांना देण्यात आलेले आहेत.
 • जिल्ह्याचे  एस.पी (SP) डी .वाय.एस पी (Dy. SP) आणि इतर पदाधिकारी याकडे लक्ष घालतील आणि त्वरित गुन्हे मागे घेतल्या जातील.

चार्जशीट दाखल होण्यापूर्वी सर्व नावे वगळण्यात येतील असे राजेश टोपे यांनी आणि अर्जुन खोतेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले आहे.

 • दिलेल्या आश्वासना मधला एक शब्दही इकडे तिकडे नको.
 • उद्या सकाळी 11 वाजता चर्चा करून निर्णय घेणार जरांगे पाटील.
 • वंशावळी नाही त्यांनाही सरसकट दाखले द्या जरांगे पाटील सरसकट दाखल्यांबाबत समितीला अहवाल द्यावा लागणार जरांगे पाटील.

सरकारच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटते श्री मनोज जरांगे हे उद्या अकरा वाजता काय निर्णय घेतील कमेंट मध्ये कळवा

Leave a Comment