कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका निर्यातीवर 40% शुल्क…

Onion farmers will be hit by 40% duty on exports : महाराष्ट्र त्याचबरोबर देशाच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा कांदा चे दर महागल्याने केंद्र सरकार त्याकडे गंभीरपणे लक्ष घालत आहे. आधी टमाटे आणि इतर फळभाज्या सुद्धा महागलेले असताना त्यात कांद्याचे दर वाढण्याची भीती केंद्र सरकारला आहे त्यामुळे त्यांनी कांदा दरवाढीच्या भीतीने निर्यातीवर 40% शुल्क आकारण्यात आले आहे. हे शुल्क दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत राहतील अशी केंद्र सरकारने सुचविले आहे. संपूर्ण माहिती खाली दिलीप आहे.

शेतकऱ्यांना फटका बसणार : गेल्या वर्षी झालेल्या पाऊस आणि त्यानंतर लांबलेल्या उन्हाळा यामुळे कांद्याचा दर्जा घसरला परिणामी वर्षभर शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळाला नाही. त्यातच आता निर्यात शुल्क लागू केल्यानंतर भाव घसरण्याची भीती आहे त्याचा मुख्यतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

कांदा दरवाढीच्या भीतीने निर्यातीवर 40% शुल्क आकारण्यात आले आहे : कांद्याची तर वाढण्याची भीतीने केंद्र सरकारने शनिवारी निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लागून केले 31 डिसेंबर पर्यंत कांद्यावर निर्यात शुल्क लागू असेल देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची पुरेशी उपलब्ध राहावी, यासाठी शुल्क लागू केल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अतिसुचनेत म्हटले आहे.

यंदा महाराष्ट्र पावसाची उशिरा आगमन झाल्याने नवीन कांदा बाजारामध्ये उशिरा येणार आहे. त्यातच गेल्या वर्षी अतिवृष्टीने कांदा खराब झाला होता. उन्हाळी कांदाही आता खराब होत आहे केंद्राचा निर्णय शेतीसाठी मार्ग ठरेल.

निर्णय का : उशिरा आलेल्या पावसाने खरीपाच्या कांद्याचे बाजारात ऑक्टोंबर मध्ये आगमन होण्याची शक्यता त्यामुळे कांद्याची टंचाई निर्माण होऊन भाव वाढण्याची भीती.

1 thought on “कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका निर्यातीवर 40% शुल्क…”

Leave a Comment